मुंबईत १११ अवैध पोलीस चौक्या असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ असे ब्रिद मिरवणार्या पोलीस दलाला हे अशोभनीय आहे, असे खडेबोल उच्च न्यायालयाने आज सुनावले.
अवैध पोलीस चौक्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका इंदर चुगानी यांनी केली आहे. या याचिकेत २00७ मध्ये सह पोलीस आयुक्त (प्रशासकीय) यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून मुंबईत २६९ अवैध पोलीस चौक्या असल्याची कबूली दिली होती. यातील १५८ चौक्या पाडण्यात आल्या असून उर्वरित नियमित केल्या जाणार असल्याचेही न्यायालयात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आज पाच वर्षे झाली तरी याबाबत पुढे काहीच झाले नसल्याचे चुगानी यांनी आज न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
त्यावर संतप्त झालेल्या न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने वरील खडेबोल सुनावले. तसेच उर्वरित १११ पोलीस चौक्यांचे नेमके काय करण्यात आले याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. त्याचबरोबर मुंबईत एवढय़ा तर राज्यभरात किती अवैध पोलीस चौक्या आहेत याची माहिती देखील पोलिसांनी सादर करावी, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. यावरील पुढील सुनावणी ४ आठवड्यांनी होणार आहे.

No comments:
Post a Comment