आठवले यांनी केला.मोदी सरकारचा निषेध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवले यांनी केला.मोदी सरकारचा निषेध

Share This

मुंबई - गुजरात पोलिसांच्या गोळीबारात चार दलित ठार झाल्याबद्दल ‘रिपाइं’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोदी सरकारचा निषेध केला.

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त दलितांना पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले. शनिवारी गुजरातमधील ठाना येथे दलित आणि बरवाड या दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. गुन्हा नोंदवण्याची मागणी करत दलितांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी मोर्चावर अमानुष गोळीबार केला होता. त्यामध्ये चार दलित तरुणांचा बळी गेला होता.27 सप्टेंबर रोजी आपण स्वत: सुरेंद्रनगरला भेट देणार असून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages