महापौर बंगला येथे `इको फ्रेंडली’ गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

मुंबई - मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांचे निवासस्थान महापौर बंगला, शिवाजी पार्क येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे काल (दिनांक २० सप्टेंबर २०१२) सायंकाळी महापौर बंगला येथे बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यावेळची ही क्षणचित्रे. महापौर बंगला येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेली ही गणेश मूर्ती पर्यावरणपूरक म्हणजेच `इको फ्रेंडली’ होती. महापालिकेच्या पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेशच महापौरांनी यानिमित्ताने दिला.


No comments:
Post a Comment