दलितांच्या जमिनीं सवर्णांना व कंपन्यांना विकत घेता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलितांच्या जमिनीं सवर्णांना व कंपन्यांना विकत घेता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय

Share This

दलितांच्या जमिनीं सवर्णांना व कंपन्यांना विकत घेता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय   

यापुढे अनुसुचित जाती आणि जमातीच्या जमिनी सवर्णांना तसेच कंपन्यांना विकत घेता येणार नाहीत असे व्यवहार बेकायदा ठरवले जातील असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिला .न्या के एस राधाकृष्णन आणि न्या दिपक मिश्र यांच्या खंडपीठाने राजस्थान सरकारने हायकोर्टाच्या निर्णया विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना हा निर्णय दिला 


अंजनेय ऑरगॅनिक हर्बल्स प्रा लिं या कंपनीने अनुसूचित जातीमधील व्यक्ती कडून विकत घेतलेल्या भूखंडाच्या व्यवहाराला राजस्थान हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला होता ्यवहारात कंपनीचा सहभाग असल्याने त्यात कुठल्याही जातीचा संबंध येत नाही त्यामुळे कलम ४२  ला धक्का बसत नसल्याचे मत हायकोर्टाने नोंदवले होते सुप्रीम कोर्टाने यावर निकाल देताना ही जमीन कंपनीने नंतर एखाद्या सवर्णाला विकली तर तो अप्रत्यक्षरित्या तो कायद्याचा भंग ठरतो असे म्हटले आहे ही परिस्थिती टाळण्यासाठी कंपन्यानांनाही असे व्यवहार करता येणार नाहीत असे खंडपीठाने स्पष्ट केले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages