फेसबुकने बनावट आणि संशयित प्रोफाइलची सुरु केली चौकशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

फेसबुकने बनावट आणि संशयित प्रोफाइलची सुरु केली चौकशी


फेसबुकने बनावट आणि संशयित प्रोफाइलची सुरु केली चौकशी 
मुंबई - सोशल नेटवर्किंग साइटचा गैरवापर करू पाहणार्‍यांना चाप लावण्यासाठी फेसबुकने सध्या जोरदार मोहीम सुरू केली आहे. बनावट आणि संशयित वाटणार्‍या प्रोफाइलची शहानिशा करण्यासाठी आता संबंधितांना थेट फेसबुकचा फोन येऊ शकतो. प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलून प्रोफाईलची खातरजमा करण्यात येईल.

कंपनीचे व्यवसाय प्रतिनिधी पवन वर्मा यांनी ही माहिती दिली. एखादे अकाउंट प्रत्यक्ष नावाने न उघडता डमी नावाने उघडले जाते. आपल्या फोटोऐवजी सेलिब्रिटिज किंवा काटरूनचा वापर केला जातो. काही अकाउंट प्रोफाइलपुरतीच असतात. अशी अकाउंट्स संशयित ठरू शकतात. फेसबूकवर कॉम्प्युटर प्रोग्रॅमच्या साह्याने बनावट अकाउंट्स उघडली जात असल्याचे चर्चिले जात आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS