मुंबई : चिमण्यांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी त्यांना राज्यपक्ष्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी स्पॅरो शेल्टर या प्राणीमित्र संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे यासंबंधीच्या एका निवेदन पत्राकान्वये मागणी केली आहे.राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण होत आहे. मोबाइल टॉवरचे वाढते जाळे, काचेच्या इमारती आणि वाढत्या प्रदूषणामुळे चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास सुरुवात झाली आहे. स्पॅरो शेल्टरच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक, कृत्रिम घरटय़ांच्या माध्यमातून 1 लाखांहून अधिक चिमण्यांचे संवर्धन केले गेले आहे. सचिन तेंडुलकर, भरत दाभोळकर, विद्या बालन, माधुरी दिक्षित यासारख्या सेलिब्रिटी तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. या उपक्रमाला बळ देण्यासाठी चिमणी हा राज्यपक्षी म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक संवर्धन करून प्रयत्न केले पाहिजे, असे प्रमोद माने यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. |
Post Top Ad
10 September 2012
Home
Unlabelled
चिमणीला राज्यपक्षी घोषित करण्याची मागणी
चिमणीला राज्यपक्षी घोषित करण्याची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment