"इन्स्पायर अवॉर्ड'चे गुरुवारपासून प्रदर्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

"इन्स्पायर अवॉर्ड'चे गुरुवारपासून प्रदर्शन


"इन्स्पायर अवॉर्ड'चे गुरुवारपासून प्रदर्शन
मुंबई- केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सुरू झालेल्या "इन्स्पायर अवॉर्ड' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध प्रयोगशील कलाकृतींचे राज्यस्तरीय प्रदर्शन येत्या गुरुवारपासून (ता.13) भरणार आहे. 

देशाला वैज्ञानिकांची गरज आहे. त्यामुळे शालेयस्तरावरच विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने केंद्राने गेल्या वर्षापासून "इन्स्पायर' ही योजना सुरू केली आहे. कल्पक व नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोग सादर करणाऱ्या उत्कृष्ट कृतींसाठी केंद्राकडून घसघशीत शिष्यवृत्तीची तरतूद या योजनेत असून त्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात येणार आहेत. 

जिल्हास्तरावर यापूर्वीच झालेल्या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या निवडक प्रयोगांचे प्रदर्शन आता मुंबईत भरविण्यात येणार असून यात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या कलाकृती असतील, असे सूत्रांनी सांगितले. हे प्रदर्शन 13 ते 15 सप्टेंबर असे तीन दिवस दादरच्या राजा शिवाजी हायस्कूलमध्ये असेल. गुरुवारी सकाळी 11 वाजता शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल; तर 15 सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्या हस्ते समारोप होईल. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS