माध्यमांनी सनसनाटी बातम्या देण्याचा मोह टाळावा- मनमोहन सिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

माध्यमांनी सनसनाटी बातम्या देण्याचा मोह टाळावा- मनमोहन सिंग


माध्यमांनी सनसनाटी बातम्या देण्याचा मोह टाळावा- मनमोहन सिंग


माध्यमांनी सनसनाटी बातम्या देण्याचा मोह टाळत समाजात व देशात आपल्या लिखाणाने दुही माजणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माध्यमांना दिला आहे. 

केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट संघटनेच्या ५० व्या वर्धापनदिन उदघाटन समारंभ कार्यक्रमात डॉ. सिंग बोलत होते.

ते म्हणाले, माध्यमांचे महत्त्व मोठे असून, त्यांची भूमिका देशासाठी महत्त्वाची असते. सातत्याने जागरुक राहत सामाजिक सलोखा राखण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि संतुलित वार्तांकन करणे गरजेचे आहे. 

देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी देशात पडलेली दरी चिंताजनक आहे. आसाममध्ये झालेला हिंसाचार आणि त्याचे देशभर उमटलेले पडसाद पाहता सामाजिक शांतता राहील, अशी परिस्थिती नसल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. 

माध्यमांना सल्ला देताना सिंग म्हणाले, आपल्याला अभिमान असला पाहिजे की भारतीय घटनेने सर्वांना अभिव्यक्तीस्वातंत्र दिले आहे. त्यामुळे माध्यमांनी केवळ मते न मांडता ठोस भूमिका घ्यायला हवी. माध्यमांनी देशाचे रक्षक म्हणून काम करायला हवे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages