डिझेल ५ रुपयांनी महागले; वर्षाला फक्त ६ सबसिडाईज्ड सिलिंडर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

डिझेल ५ रुपयांनी महागले; वर्षाला फक्त ६ सबसिडाईज्ड सिलिंडर


डिझेल ५ रुपयांनी महागले; वर्षाला फक्त ६ सबसिडाईज्ड सिलिंडर


नवी दिल्ली - आधीच महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सामान्य माणसाला केंद्र सरकारने गुरुवारी '४२० व्होल्ट'चा झटका दिला. केंद्र सरकारने डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर यापुढे एका कुटुंबासाठी आर्थिक वर्षात केवळ सहाच अनुदानित (सबसिडाईज्ड) सिलिंडर देण्यात येणार आहेत. सहा सिलिंडरच्यावर प्रत्येक कुटुंबाला बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावा लागेल. या निर्णयामुळे देशातील सामान्यांचे कंबरडे मोडणार हे निश्चित मानले जात आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर ५.५० रुपयांनी कमी करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला. 

डिझेलची दरवाढ गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. वर्षाला केवळ सहाच अनुदानित सिलिंडर देण्याच्या निर्णयाचे कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील. सहापेक्षा जास्त सिलिंडर घेणाऱयांना प्रत्येक सिलिंडर ७५० ते ८०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला बाजारभावानुसार फरक पडेल. पेट्रोलियम कंपन्यांना प्रतिलिटर डिझेलमागे सध्या १९.२६ रुपयांचे नुकसान होत होते. त्यामुळे डिझेलची दरवाढ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS