केरोसिन अनुदान योजनेसाठी बॅंक खाते उघडणे आवश्‍यक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

केरोसिन अनुदान योजनेसाठी बॅंक खाते उघडणे आवश्‍यक

केरोसिन अनुदान योजनेसाठी बॅंक खाते उघडणे आवश्‍यक
मुंबई - केरोसिन वाटपातील भ्रष्टाचार आणि काळाबाजार रोखण्यासाठी केरोसिनवरील अनुदान लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्याची योजना बृहन्मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे, वर्धा आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा पूर्वभाग म्हणून अनुदानित केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारक पती-पत्नीच्या नावे राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडणे आवश्‍यक आहे. बॅंक खाते उघडण्याची कार्यवाही 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्राने पुढाकार घेतलेल्या या योजनेची केंद्र सरकारने वाखाणणी केली आहे. शिधापत्रिकाधारक कुटुंबप्रमुख महिलेचे राष्ट्रीयीकृत बॅंकेत आधी खाते असल्यास नवे खाते उघडण्याची गरज नाही; पण शिधापत्रिकाधारक कुटुंबप्रमुख पुरुष असल्यास पती-पत्नीच्या नावे संयुक्त बॅंक खाते उघडणे आवश्‍यक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. केरोसिनची बाजारभावानुसार प्रचलित किंमत 58 रुपये प्रतिलिटर असली, तरी अनुदानामुळे शिधापत्रिकेवर ते 14 रुपये दराने मिळते. नवीन सरकारी योजनेनुसार शिधापत्रिकाधारकांना किरकोळ केरोसिन विक्रेत्याकडून बाजारभावानुसार केरोसिन खरेदी करावे लागेल. केरोसिन विक्रीची नोंद शिधावाटप कार्यालयाला केरोसिन विक्रेत्याकडून प्राप्त झाल्यानंतर अनुदानाची रक्कम शिधापत्रिकाधारकाच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकार केरोसिन अनुदानापोटी दर वर्षी 5 हजार कोटी रुपये खर्च करते, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS