"एफडीआय'मुळे "रिटेल'ला चालनाच
मुंबई- जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात "रिटेल' हे वाढते क्षेत्र आहे. थेट परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) दार मोकळे करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्राच्या वाढीला चालनाच मिळेल, असे स्वागत "महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री'ने (एमसीएचआय) केले आहे. देशात नागरीकरण वेगाने वाढत असल्याने पूरक घटकांची वाढ होणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर शेतकरी, तसेच व्यापारी आणि उद्योजकांना नवीन "आऊटलेट'चा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे किरकोळ विक्री दालनांच्या साखळीत वाढ होईल आणि सर्वांनाच फायदा होईल. नवे रोजगार निर्माण होतील आणि शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलेल, असा आशावाद "एमसीएचआय'चे अध्यक्ष पारस गुंडेचा यांनी व्यक्त केला. "मल्टी ब्रॅंड रिटेल'मध्ये थेट परकी गुंतवणुकीला मुभा देताना लहान दुकानदारांच्या हिताचे सरकारने रक्षण करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


No comments:
Post a Comment