एफडीआयसंदर्भातील सरकारचा निर्णय आत्मघातकी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एफडीआयसंदर्भातील सरकारचा निर्णय आत्मघातकी

Share This

एफडीआयसंदर्भातील सरकारचा निर्णय आत्मघातकी
मुंबई- रिटेल आणि हवाई वाहतूक क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आत्मघातकी आहे. या निर्णयामुळे देशाच्या स्वातंत्र्याला धोका पोहोचू शकतो, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनीकेली. सरकारच्या या निर्णयाला आपल्या पक्षाचा विरोध आहे, असेही ते म्हणाले.

काही स्वार्थी पक्ष लाभ मिळविण्यासाठी एफडीआयला पाठिंबा देत आहेत. एफडीआयच्या माध्यमातून सरकार देश परकीयांच्या हातात आहे. एफडीआयच्या माध्यमातून रोजगार वाढेल, असे सांगणारे राजकारणी नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका करतानाच सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages