मुंबई - कोळसा गैरव्यवहाराच्या मुद्दयावरून कॉंग्रेसला केंद्रात आणि राज्यात टार्गेट करून "सळो की पळो' करण्याची भारतीय जनता पक्षाची रणनीती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा नेते बुचकळ्यात पडल्याचे मानले जात आहे.
कोळसा गैरव्यवहाराचे प्रकरण उकरून काढून कॉंग्रेसला नामोहरम करण्याची भाजपा नेतृत्वाची रणनीती आहे. त्यासाठी भाजपाने डावपेच आखले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीत संसदेत आणि संसदेबाहेर कॉंग्रेसची जितकी कोंडी करता येईल तितकी करण्याचा मनसुबा भाजपाने आखला आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपाने कॉंग्रेसला टार्गेट करण्यास प्राधान्य दिल्याचे भाजपात बोलले जाते. त्यामुळेच कोळसा प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याविरोधात जोरदार आरोप मोहीम भाजपाने उघडली होती. त्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या हे कामास लागले आहेत, असेही बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या गैरव्यवहारांचा प्रश्न सध्या भाजपाच्या एैरणीवर नाही. त्याएवजी कोलगेट वरून कॉंग्रेसला जितके बॅकफुटवर ढकलता येईल तितके ढकलणे ही भाजपची राज्यातील रणनीती आहे. या रणनितीला बऱ्यापैकी यश आल्याची भाजपात चर्चा आहे. कॉंग्रेसच्या खच्चीकरणाची भाजपची मालिका सुरू असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोळसा प्रकरणात ओढण्याचा डावपेच आखल्याचे भाजपातील अंतस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. अशावेळी कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेते बुचकळ्यात पडले. राजीनामा तातडीने स्वीकारावा - मुंडे अजित पवारांनी नैतिकतेच्या भूमिकेतून दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वीकारावा. तसेच राज्याच्या तिजोरीवर भार टाकणाऱ्या या प्रकरणाची (सिंचन प्रकल्पाची) सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे खासदार मुंडे यांनी केली आहे. |
Post Top Ad
27 September 2012
Home
Unlabelled
दादांच्या राजीनाम्याने भाजप बुचकळ्यात
दादांच्या राजीनाम्याने भाजप बुचकळ्यात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment