प्रमोद तावडेंवर शिस्तभंगाची कारवाई? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

प्रमोद तावडेंवर शिस्तभंगाची कारवाई?

मुंबई - आझाद मैदान हिंसाचारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्चाच्या वेळी राज ठाकरे यांना फूल देऊन हस्तांदोलन करणारे पोलिस शिपाई प्रमोद तावडे यांची खात्यांतर्गत चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल वायरलेस विभागाच्या उपायुक्तांनी पोलिस आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता तावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

मनसेने 21 ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चाच्या वेळी भायखळ्याच्या वायरलेस विभागातील पोलिस शिपाई प्रमोद तावडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फूल देऊन हस्तांदोलन केले होते. नंतर त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देताना वरिष्ठांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल वक्तव्य केले होते. या प्रकरणी वायरलेस विभागाचे उपायुक्त बाळाराम यादव तावडे यांची खात्यांतर्गत चौकशी करीत होते. ती आता पूर्ण झाली असून, त्यांनी आपला अहवाल नुकताच पोलिस आयुक्तांना सादर केला आहे. त्यात तावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS