पृथ्वीला आवरणाने झाकण्याची मोहीम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पृथ्वीला आवरणाने झाकण्याची मोहीम

Share This
ग्लोबल वॉर्मिगचा दाह कमी करण्यासाठी
पृथ्वीला आवरणाने झाकण्याची मोहीम

वॉशिंग्टन : ग्लोबल वॉर्मिगच्या विळख्यात सापडलेल्या पृथ्वीचे वातावरण झपाटय़ाने पालटत आहे. सूर्याच्या भयंकर उष्णतेपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता अनोखी मोहीम सादर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या वातावरणाचा बाह्य स्तर समतापमंडळात (स्टॅटोस्फीयर) सूर्याच्या प्रखर किरणांपासून पृथ्वीचा बचाव करणारे विशिष्ट पदार्थ पोहोचवले तर निश्चितच ग्लोबल वॉर्मिगचा दाह कमी केला जाऊ शकेल. अमेरिकी शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वातावरणात सोलर अशा पदार्थाना समतापमंडळात पोहचवण्याचे तंत्रज्ञान विकसितसुद्धा केले आहे. आवरणामध्ये हे पदार्थ सोडल्यानंतर त्यांना वेगळे स्वरूप व आकार दिला जाऊ शकतो. या मोहिमेवर फक्त पाच अब्ज डॉलर एवढा खर्च येईल. वातावरणात 10 ते 15 किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या समतापमंडळ स्तरामध्ये सूर्यापासून येणार्‍या उष्णतेपासून वाचवणारे ओझोन वायूचे कवचही आहे. सध्या जगभरात होणारे कार्बन डायॉक्साइडचे उत्सर्जन रोखण्यासाठी दरवर्षी सुमारे 200 ते 2000 अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च केला जातो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, आता असे एक तंत्रज्ञान हाती आले आहे, ज्याच्या मदतीने सूर्याच्या अतिरिक्त किरणांना परावर्तीत करून पृथ्वीला वाढत्या तापमानाच्या मगरमिठीतून सोडवता येऊ शकते. जिओइंजिनीयरिंगच्या या तंत्रज्ञानाला सोलर रेडिएशन मॅनेजमेंट म्हटले जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने समतापमंडळामध्ये स्टॅटोस्फरिक सल्फरचे प्रमाण वाढले जाते. काही शास्त्रज्ञांनी मात्र वायूमंडळातील हरितगृहे वायूंचे प्रमाण कमी करण्यात या तंत्रज्ञानाचा कोणताही प्रभाव पडत नाही, असा आक्षेप घेतला आङे. सूर्यकिरणांची प्रखरत कमी करून समुद्रात वाढणार्‍या अँसिडवरही काहीच फरक पडत नाही. ग्लोबल वॉर्मिगसाठी हे सगळे घटकही कारणीभूत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. काही शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानासंबंधी चिंताही व्यक्त केली असून या एकतर्फी कारवाईबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वायूमंडळात पृथ्वीपासून 18 ते 30 किमी अंतरावर सहा भिन्न प्रणालींसाठी 10 ते 50 लाख घन टन पदार्थ पाठविले जाऊ शकतात व त्यासाठी विमानांचा वापर केला जाईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages