मद्यप्राशन करून मोटारसायकल चालवणारा पोलीस बडतर्फ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2012

मद्यप्राशन करून मोटारसायकल चालवणारा पोलीस बडतर्फ

मद्यप्राशन करून मोटारसायकल चालवणारा पोलीस बडतर्फ 
मुंबई : मद्यप्राशन करून मोटारसायकल चालवणार्‍या एका पोलीस कॉन्स्टेबलला मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. देवनार पोलीस ठाण्यातील स्नेहल धनपाल थोरात असे त्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. मानखुर्द पोलिसांनी मार्चमध्ये मद्याच्या धुंदीत ड्रायव्हिंग करताना त्याला अटक केली होती. मुंबईत 'ड्रंक ड्रायव्हिंग'च्या गुन्ह्यात पोलिसावर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

थोरात हा मद्यप्राशन करून मोटारसायकल चालवताना मानखुर्द पोलिसांच्या तावडीत सापडला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात मोटर वाहन कायद्यातील विविध कलमांतंर्गत गुन्ह्याची नोंद केली होती. 2001 साली पोलीस सेवेत रुजू झालेल्या थोरातने सुरुवातीला आपण मद्यप्राशन न केल्याचा दावा केला होता,मात्र वैद्यकीय चाचणीत त्याच्या दाव्यातील खोटेपणा उघड झाला. अटकेच्या कारवाईनंतर त्याला एपिल्र महिन्यात कुर्ला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 'ड्रंक ड्रायव्हिंग'च्या गुन्ह्यात दोषी ठरवून 2 हजारांच्या दंडासह 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. थोरातला अलिकडेच एक नोटीस बजावून त्याच्यावरील बडतर्फीची माहिती देण्यात आली आहे. कायद्यासमोर सर्व समान असून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कायदा मोडणार्‍या पोलिसांचीही गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS