बदनामी करणार्‍यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा - पांढरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2012

बदनामी करणार्‍यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा - पांढरे

सिंचन विभागात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या पोकार कॉलनीतील घर तसेच ते कार्यरत असलेल्या मेरी कार्यालयाला पोलिसांनी खडा पहारा दिला दिला आहे. सध्या गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिसांनी ही पूर्व काळजी घेतली आहे. विजय पांढरे यांना भेटण्यासाठी येणार्‍यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगीदेखील नाकारण्यात येत आहे. त्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे एक पथक बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक, दोन अंगरक्षक व इतर चार कर्मचार्‍यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. पांढरे यांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याचे आदेश असल्याचे त्यांचे अंगरक्षक नीलेश पवार यांनी सांगितले आहे.?नाशिक : आपण जलसिंचन घोटाळ्याबाबत केलेले आरोप सत्य असल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला आहे. मला मनोरुग्ण ठरविणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पांढरे यांनी दै.'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले. त्याबाबतची तयारीही त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत सुरू केली आहे. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचे प्रकरण अधिकच गाजणार असल्याचे दिसते.

मी मनोरुग्ण असेन तर सिंचन घोटाळ्याबाबत दिलेल्या पत्रानंतर शासनाने माझ्यावर योग्य ती कारवाई का केली नाही? खरे तर माझी मानसिक चाचणी करून मला सेवेतून काढून टाकायला हवे होते, तसेच माझ्या पत्रात मी केलेले आरोप खोटे असतील, तर खोटे पत्र दिल्याबद्दल माझ्यावर कारवाई व्हायला हवी होती. पण शासनाने मला आतापर्यंत साधे स्पष्टीकरण सुद्धा विचारलेले नाही. इतकेच नव्हे, तर 2003 साली मला अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती दिली. माझे गोपनीय अहवाल उत्कृष्ट दर्जाचे आहेत. तसेच गोशीखुर्द डाव्या कालव्याच्या चौकशीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली, त्या मेंढेगिरी समितीचा मी सदस्य होतो. त्या समितीने गोशीखुर्द डाव्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल दिला होता. तरीही शासनाने मला 2011 मध्ये मुख्य अभियंतापदी पदोन्नती दिली. त्यामुळे मला मनोरुग्ण म्हणणार्‍यांनी सर्व बाबी पडताळून पाहाव्या आणि नंतरच बोलावे, असे पांढरे यांनी ठणकावले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS