राजगृहाला हेरीटेज पेक्षा राष्ट्रीय स्मारक करावे - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2012

राजगृहाला हेरीटेज पेक्षा राष्ट्रीय स्मारक करावे - आनंदराज आंबेडकर


P1040366.JPG
मुंबई / अजेयकुमार जाधव 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या दादर हिंदू कोलोनी येथील राजगृहाला सरकारने हेरिटेजचा दर्जा दिल्या बाबत सरकारचे आभार व्यक्त करत सरकारने राजगृहाला हेरीटेज करण्यापेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे अशी मागणी डॉ आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केली.

मुंबई मध्ये सर्वत्र हेरीतेज्ला विरोध होत असताना आंबेडकर घराण्याने मात्र हेरीतेज्चे स्वागत करत राज्गृहाच्या ठ्कीकानी राष्ट्रीय स्मारक होत असेल तर आम्ही या इमारतीमधून इतर ठिकाणी जाण्यास तयार असल्याचे सांगितले अशीच भूमिका येथील भाडेकरुनी सुद्धा घेतली असून बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इमारत खाली करण्यास आम्ही तयार असून येथे लवकरात लवकर  स्मारक उभारावे अशी मागणी केली.

१९३३ साली बाबासाहेब आंबेडकर यांनी या इमारतीची बांधणी केली असून बिहारची राजधानी राजगिर येथे भगवान बुद्ध प्रवचन द्यायचे याला राजगृह असेही संबोधले जायचे याच नावावरून या इमारतीला राजगृह असे नाव देण्यात आले. या इमारतीमध्ये बाबाशेबांची ३० हजार पुस्तके होती पुढे याची सख्या वाढून ५० हजार झाली. बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर ही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालयाला देण्यात आली. तसेच त्यंच्या काही वस्तू सिम्बोयसीस या संस्थेला सविता आंबेडकर यांनी दिल्या.

बाबासाहेबांच्या १९३३ ते महापारीनिर्वाना पर्यंतच्या सर्व आठवणी याच राजगृह मध्ये होत्या. येथेच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.याच इमारतीमध्ये सध्या आंबेडकरांचे वारस राहत आहेत. हेरिटेजचा "अ" दर्जा मिळाल्याने या इमारतीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही बदल किवा दुरुस्ती करावयाची असल्यास त्याला हेरीएज कमिटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई मध्ये "अ" दर्जा फक्त सीएसटी रेल्वे स्थानक,   गेट वे ऑफ इंडिया,कान्हेरी गुफा,क्रॉफर्ड मार्केट परिसर, महाकाली कोन्दिवती लेणी यांनाच दिला आहे.यामुळे राजगृहाला ऐतिहासिक वास्तू म्हणून विशेष महाव निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS