पाण्याचे मोबाइल बिल रेंजबाहेर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2012

पाण्याचे मोबाइल बिल रेंजबाहेर

आपले पाण्याचे बिल किती, याची माहिती मोबाइलवर देण्याची सुविधा महापालिकेने सुरू केली असली तरी त्याला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली. 
महापालिकेने मुंबईत ३ लाख ६५ हजार पाण्याचे मीटर बसविले. या मीटरद्वारेच पाण्याचा वापर आणि त्याचे बिल ठरते. हे बिल पालिकेकडून संबंधीतांना धाडले जाते. मात्र वेळ वाचविण्यासाठी पालिकेने सहा महिन्यांपूर्वी पाण्याचे बिल मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. 
त्यासाठी ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक त्या त्या वॉर्ड ऑफिसमध्ये नोंदविणे आवश्यक होते. मात्र या योजनेला मुंबईकर प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे आजही पाण्याचे बिल मोबाइलवर मोठय़ा प्रमाणावर अपटेड होत नसल्याची खंत या विभागाचे उप जल अभियंता अनिल तवाडीया यांनी व्यक्त केली. पाण्याच्या बिलांसोबतच पाणी कपात तसेच पाणी गळतीची माहितीही मोबाइलवर अपटेड होते. पण ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही माहिती पोहोचत नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS