देवनागरीतील नंबर प्लेट्सवर पोलिसांची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देवनागरीतील नंबर प्लेट्सवर पोलिसांची कारवाई

Share This

देवनागरी लिपीतील नंबर प्लेट्सवर पोलिसांची कारवाई

तुमच्या गाडीची नंबरप्लेट देवनागरी लिपीत असल्यास ती लवकरच बदलून घ्या. कारण नवीन नियमानुसार वाहतूक पोलिसांनी देवनागरी लिपीत असणाऱ्या नंबर प्लेट्सवर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटवर बेकायदा अक्षर आणि अंकांचे खेळ करत फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनाचालकांविरोधात धडक मोहीम उघडण्याचा निर्णय मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. देवनागरी लिपीत नंबर प्लेट्स लिहिण्याचा वाढता कल पाहता ही मोहीम राबवण्यात येणार आहे. अशा प्रकारे नंबर प्लेट्सवर देवनागरी लिपीत लिहिण किंवा सजावट करणे हे मोटार कायद्याच्या १९८९ नियमानुसार बेकायदेशीर आहे.

आत्तापर्यंत फॅन्सी प्लेट्स वापरणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान तब्बल २६,८५२ दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर फॅन्सी प्लेट्स लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसच अशा चालकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम २८.५ लाख रुपये एवढी आहे.

देवनागरी लिपी किंवा मराठीत लिहिलेल्या नंबर प्लेट्समूळे वाहतूक पोलिसांना गाडीचा नंबर टिपण्यास अडचण येत असते. तसच मोटार कायद्याच्या कलम ५०(ड), १९८९ नुसार इंग्रजी भाषेशिवाय दुसऱ्या भाषेत नंबर प्लेट असण हे बेकायदेशीर आहे, असं पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages