पालिकेतील चिटणीस पदावरून वादंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2012

पालिकेतील चिटणीस पदावरून वादंग


mcgm bldg.jpgBMC Comm Sitaram Kunte.jpg


मुंबई महानगर पालिका भारतातील सर्वात मोठी महानगर पालिका असून या पालिकेचे २६ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. मुंबईचा विकास आणि मुंबईकरांना विविध सुविधा पालिके मार्फत पुरविल्या जात आहेत. याच पालिकेमध्ये जातीय वाद इतका पसरला आहे कि एखादे वरिष्ट पद रिक्त होत असले कि येथील सत्ताधारी व पालिका प्रशासनातील वरिष्ट अधिकारी ब्राम्हण समाजाचा अधिकारी या पदावर कसा नियुक्त केला जाईल यासाठी प्रयत्नात असतात. चिटणीस पदावर जवळपास अडीच वर्षे प्रभारी व नंतर सहा महिने पूर्ण वेळ नियुक्ती नंतर कुलकर्णी या ३० साप्तेम्बारला निवृत्त झाल्या आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा याची प्रचीती पालिकेमध्ये पाहायला मिळत आहे.

मुंबई महानगर पालिकेमधील चिटणीस हे खाते सर्वात महत्वाचे असे खाते आहे. या खात्याच्या प्रमुख पदी असलेल्या माजी चिटणीस जोशी यांच्या जागी चिटणीस मृदुला कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती केल्यानंतर याच पदावर चिटणीस विभागातील पठाडे या अधिकाऱ्याने पालिकेच्या नियमानुसार आपला दावा केला होता. पालिकेने हा दावा फेटाळला यामुळे पठाडे यांनी न्यायलयात धाव घेवून चिटणीस पदावर कुलकर्णी यांची नियुक्ती बेकायदेशीर असून या पदासाठी आपण लायक उमेदवार असल्याचे दाखवून दिले होते. परंतु पठाडे हे मागासवर्गीय असल्याने पालिकेमधील धूर्त अश्या जातीवादी प्रशासनाने हे पद एम. पी. एस. सी. मार्फत  भरण्यात येईल असे सांगून कोर्टामधील दावा निकाली काढण्यास कोर्टाला मजबूर केले. यामुळे कुलकर्णी यांना अडीच वर्षे बक्षीस म्हणून चिटणीस पद प्रभारी म्हणून आंदन देण्यात आले होते.

आता हे पद पुन्हा रिक्त झाले आहे. या पदावर पुन्हा आमल्या मर्जीतील व पालिकेचे कायदे बाजूला सारून आपली हवी तशी कामे करून घेता यावीत यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हे पद पालिकेमधील अधिकाऱ्यांना पदोन्नती देवून भरावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनी हे पद एम. पी. एस. सी. मार्फत भरावे यासाठी आयोगाला पत्र पाठवून परीक्षा घेवून पत्र उमेदवाराची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. यामुळे सत्ताधार्यांनी आयुक्तांवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणून आयोगाला पाठवलेले पत्र रद्द करण्यास किवा मागे घेण्यास सांगितले जात आहे.
 
पालिकेमधील कामकाज इतके किचकट असते कि हे कामकाज पालिकेच्या बाहेरील अधिकाऱ्यांना समजण्यास दोन तीन वर्षे लागतील त्यामुळे पालिकेचे कामकाज रखडेल असे सांगितले जाते. याचा विचार केल्यास पालिकेमध्ये पाच आय एं एस अधिकारी आहेत हे सुद्धा बहरून आलेले असतात टे बाहेरून आल्यामुळे कधी पालिकेचे कामकाज राखाडले नाही. पालिकेच्या कामकाजाचा अनुभव नसलेले नगरसेवक म्हणून निवडून येतात त्यांच्या मुळे आत्ता पर्यंत कधीही पालिकेचे कामकाज रखडले नाही. मग चिटणीस पदाची परीक्षा देणारा अधिकारी त्याच दर्जाचा व त्याला पालिकेच्या कामाचा अनुभव असलेलाच असणार आहे मग त्याला हे कामकाज समजणार नाही हे म्हणणे कितपत योग्य आहे. या चिटणीस पदाच्या हाताखाली त्यांना मदतीसाठी सहायक, उप चिटणीस तसेच कर्मचाऱ्यांचा ताफा मदतीसाठी आहे हे सर्व कर्मचारी चिटणीस पदावर बाहेरून अधिकारी आला तर त्याला मदत करणार नाहीत का ?

पालिकेमध्ये महापौर, उप महापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष बनणारे नगरसेवक अनुभव घेवून येत नाहीत परंतु या पदावर वर्णी लागल्यावर पालिकेकडून मिळणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कामे शिकूनच कामे करत असतात याचा विसर पालिकेतील सत्ताधार्यांना पडला असल्याचे दिसत आहे असेच म्हणावे लागेल. पालिकेत सत्तेवर असलेल्याना मागासवर्गीय अधिकारी वरिष्ट पदावर नको म्हणून पाताडे यांनी दाखल केलेल्या न्यायालयीन दाव्यामध्ये याच सत्ताधारी व प्रशासनाने आयुक्तांच्या द्वारे प्रतिज्ञापत्र सादर करून चिटणीस पद एम. पी. एस. सी. मार्फत भरू असे सांगून कुलकर्णी यांना चिटणीस पदावर कायम ठेवले होते. एकीकडे पालिका आयुक्त चिटणीस पद एम. पी. एस. सी. मार्फत भरण्यासाठी प्रयत्नात असतना सत्ताधारी आणि प्रशासन मात्र यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहेत.

याच सत्ताधार्यांना व जातीवादी प्रशासनाला या प्रतिज्ञापत्राचा विसर पडल्याचे दिसत आहे. पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन आपल्या सोयी साठी पुन्हा या प्रतिज्ञा पत्राकडे दुर्लक्ष करून चिटणीस पद त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे राहावे यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु पालिकेमधील सत्ताधारी व प्रशासन आपण  कोर्टात दाखल केलेल्या पातीज्ञापत्राच्या विरुद्ध असे  काम करून कोर्ताचाही अवमानना करत आहेत. या सर्व प्रकारावरून चिटणीस पदामुळे पालिका आयुक्त विरुद्ध सत्ताधारी व प्रशासन असा संघर्ष पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा प्रमाणे पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे चिटणीस पद एम. पी. एस. सी. मार्फत भरतात कि सत्ताधाऱ्यांच्या व प्रसानाच्या कारस्थानांना बळी पडतात याचे उत्तर मुंबईकरांना लवकरच मिळेल.
अजेयकुमार जाधव 
मो ९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS