| मुंबई : प्रशासकीय कामात माहिती आणि तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान शाखेच्या वतीने येत्या 4 आणि 5 ऑक्टोबरला मुंबईत 'इ गव्हर्नन्स' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी या परिषदेचे उद्घाटन करतील. भाजपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे निमंत्रक अरविंद गुप्ता यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपाशासित राज्यांमधील माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री तसेच मोठय़ा महानगरपालिकांचे महापौर, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. नॅसकॉम, एनआयआयटी, आयबीएम, ओरॅकल इत्यादी कंपन्यांचे पदाधिकारीही यात सहभागी होणार आहेत. जॉर्जिया तसेच अमेरिकेत यासंदर्भात झालेल्या प्रयोगांचे सादरीकरणही या परिषदेत होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कामांमध्ये पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराला वाव राहू नये, नागरिकांना मिळणारी सेवा जलदगतीने व्हावी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारनिर्मिती व्हावी तसेच संगणकीय क्षेत्रात भारतीय बनावटीच्या साधनांचा वापर कसा करता येईल, या दृष्टीने तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा होईल, असेही गुप्ता यांनी सांगितले. |
Post Top Ad
02 October 2012
Home
Unlabelled
माहिती-तंत्रज्ञानावर मुंबईत 2 दिवसांची परिषद
माहिती-तंत्रज्ञानावर मुंबईत 2 दिवसांची परिषद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment