समाजवादीत आरोप-प्रत्यारोप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समाजवादीत आरोप-प्रत्यारोप

Share This
समाजवादीत आरोप-प्रत्यारोप
मुंबई- समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी आणि जमाल कुरैशी यांनी स्वपक्षाच्या नगरसेविकेला धमकावल्याचा आरोप पक्षाचे उत्तर मध्य जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी केला आहे. खेरवाडी पोलिस ठाण्यात आझमी यांच्याविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती त्यांनी दिली. लोखंडे यांनी खंडणी मागितल्याची तक्रार आझमी यांनी गोवंडीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. आझमी यांनी समाजवादी पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 129 मधील नगरसेविका रेश्‍मा नेवरेकर आणि आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा लोखंडे यांचा आरोप आहे, पण लोखंडे यांनीच खंडणी मागितल्याचा प्रत्यारोप आझमी यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages