जल अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2012

जल अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चाचा इशारा

जल अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चाचा इशारा
मुंबई : पालिकेच्या 'डी' विभागातील महालक्ष्मी येथील दर्यासागर झोपडपट्टीत पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.या मुद्दय़ावर अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, मात्र यामध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्यास जल अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजपाच्या प्रभाग अध्यक्ष, नगरसेविका सरिता पाटील यांनी दिला आहे.

सहा महिन्यांपूर्वी या विभागातील पाणी सोडण्याच्या वेळेत बदल झाल्यापासून नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दर्यासागर परिसरात पूर्वी एक वेळा पाणी सोडण्यात येते होते, मात्र आता दोन वेळा पाणी सोडण्यात येत असले तरी योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. दुर्गादेवी व मलबार हिल या ठिकाणी एकाच वेळी पाणी सोडण्यात येते. गेल्या तीन महिन्यांपासून तर रिझर्व्ह साठय़ापेक्षा कमी पाणी असल्याने महालक्ष्मी येथील दर्यासागर भागात नागरिकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS