माझे नाव, छायाचित्र वापरू नका- हजारे
नवी दिल्ली- दिल्लीत आज झालेल्या बैठकीनंतर राजकीय पक्ष काढण्याच्या मुद्द्यावरून "टीम अण्णा'मध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझे नाव किंवा छायाचित्र वापरू नये, असेही हजारे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आज दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांशी तब्बल नऊ तास चाललेल्या बैठकीत चर्चा केली. त्यावेळी राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून हजारे आणि केजरीवाल यांच्यात एकमत होऊ शकले नाही.
""टीममध्ये फूट पडल्याची घटना दुर्दैवी आहे. मी कुठल्याही पक्षात किंवा गटात सहभागी होणार नाही. मी त्यांच्या प्रचारासाठीही जाणार नाही. माझे छायाचित्र किंवा नाव वापरू नये, असेही मी त्यांना सांगितले आहे. तुम्ही तुमची लढाई स्वतः लढावी,'' असे हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बैठकी दरम्यान किरण बेदी आणि न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी हजारे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तर प्रशांत भूषण, शांती भूषण आदींचा केजरीवाल यांच्या गटात समावेश होता.
"इंडिया अगेन्स्ट करप्शन'ने सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून केलेले सर्वेक्षण मान्य करण्यासही हजारे यांनी नकार दर्शविला. केंद्र सरकारने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी लोकपाल विधेयक मजूर करावे; अन्यथा आपण देहत्याग करू, असा इशाराही हजारे यांनी या वेळी बोलताना दिला.

No comments:
Post a Comment