"भारत बंद'पासून बसप लांबच
लखनौ- राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि "यूपीए'तर पक्षांनी आज (गुरुवार) पुकारलेल्या "भारत बंद'मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने केला आहे. रिटेल क्षेत्रात "एफडीआय'ला परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ हा "बंद' पुकारण्यात आला आहे. बसपच्या या निर्णयामुळे सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे.
सरकारच्या निर्णयाला बसपचा विरोध असला, तरी "यूपीए'ला बाहेरून पाठिंबा द्यावयाचा की नाही, याचा निर्णय हा पक्ष दहा ऑक्टोबरला करणार आहे. तोपर्यंत "बंद'मध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांपासून दूर राहण्याचे बसपने ठरविले आहे.

No comments:
Post a Comment