पुढच्या वर्षीपासून 'रोमिंग फ्री'
राष्ट्रीय दूरसंचार धोरण ( एनटीपी ) २०१२मधीलप्रस्तावानुसार , पुढील वर्षापासून संपूर्ण देशातमोबाइलचा वापर ' रोमिंग फ्री ' होणार आहे !दूरसंचार मंत्री कपिल सिबल यांनी येथील ' इंडियाइंटरनेट गव्हर्नमेंट कॉन्फरन्स ' च्या पार्श्वभूमीवरसोमवारी पत्रकारांशी बोलताना मोबाइलधारकांना ही 'गुड न्यूज ' दिली .
एनटीपी २०१२मध्ये रोमिंग चार्जेस काढून टाकण्याचेतसेच होम सर्कलबाहेर देशभरात कुठेही कोत्याहीअतिरिक्त चार्जेसशिवाय तोच मोबाइल नंबरवापरण्याची सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेआहे . मे महिन्यात या धोरणाला मंजुरी मिळाली होती .
' फ्री रोमिंग ' ही संकल्पना स्वागतार्ह आहे , मात्र ' वन नेशन - फ्री रोमिंग ' च्याअमलबजावणीसाठी दूरसंचार क्षेत्राला तपशीलवार काम करावे लागेल , असे जीएसएम तंत्रज्ञानातीलउद्योगांची संघटना सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस . मॅथ्यू यांनी सांगितले . रोमिंग फ्रीधोरणाचा मोबाइलच्या कॉलदरांवर काही परिणाम होईल का , याबाबत विचारले असता , दर निश्चितकरण्याची जबाबदारी अंतिमतः ट्रायची असल्याचे ते म्हणाले .


No comments:
Post a Comment