‘भारत बंद’ला देशभरात संमिश्र, तर राज्यात अल्प प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘भारत बंद’ला देशभरात संमिश्र, तर राज्यात अल्प प्रतिसाद

Share This

‘भारत बंद’ला देशभरात संमिश्र, तर राज्यात अल्प प्रतिसाद

मुंबई  राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आज, गुरुवारी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात संमिश्र तर महाराष्ट्रात अल्प प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात गणेशोत्सव असल्याने शिवसेना व मनसेने, तसेच पुण्यात भाजप या बंदमध्ये सहभागी झाले नाहीत. सरकारच्या डिझेल दरवाढ, तसेच रिटेल क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीच्या (एफ.डी.आय.) निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) आणि इतर विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. 
या बंदमध्ये एन.डी.ए.तील पक्षांसह समाजवादी पक्षडावे पक्ष आणि इतर पक्ष सहभागी झाले होते. आज सकाळी अलाहाबाद येथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने पाटणा येथे रेल रोको आंदोलन केले. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages