आंबेडकरांनी म्हणे मंत्रिपदासाठी लॉबिंग केले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंबेडकरांनी म्हणे मंत्रिपदासाठी लॉबिंग केले

Share This
आंबेडकरांनी म्हणे मंत्रिपदासाठी लॉबिंग केले
नवी दिल्ली - स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला जागा मिळावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचा तत्कालीन दलित चेहरा असणा-या जगजीवनराम यांना महात्मा गांधींकडे शब्द टाकण्यास सांगितले होते, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी त्यांच्या पुस्तकात हा दावा केल्याचे हिंदुस्थान टाइम्स या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गांधीजींचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर आंबेडकरी राजकारणातही गांधीजी आणि काँग्रेसचा कट्टर विरोध केला जातो, असे असताना पासवान यांच्या पुस्तकातील दावा स्फोटक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगजीवनराम यांचे चरित्र पासवान यांनी लिहिले असून त्यात हे दावे करण्यात आले आहेत. 


पासवान यांनी आंबेडकर हे मंत्रिपदासाठी सर्वतोपरी योग्य नेते आहेत, असे म्हटल्यानंतर आपले नाव गांधीजींकडे सुचवावे, असे आंबेडकर म्हणाले होते, असे हे पुस्तक म्हणते. त्यानंतर जगजीवनराम यांनी सरदार पटेल यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर गांधीजींकडे औपचारिक विनंती केली. त्यावेळी नेहरूंकडे याबाबत नक्की बोलणे करू, असे आश्वासन गांधीजींनी त्यांना दिले होते. 
अजमेर स्फोटाप्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून पुस्तकाचे प्रकाशन भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages