प्रशासकीय अधिकारी घरीही काम करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

प्रशासकीय अधिकारी घरीही काम करणार


प्रशासकीय अधिकारी घरीही काम करणार
मुंबई- मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्व कागदपत्रांसाठी ई-फाईलची आवश्‍यकता लक्षात घेऊन ही प्रक्रिया राज्याने सुरू केली आहे. सर्व कागदपत्रांचे संगणकीकरण झाल्यानंतर दररोज कामावर न येताही घरातील संगणकांवर आपल्या विभागांच्या ई-फाईल्सवर काम करून अधिकाऱ्यांना फायली क्‍लिअर करता येतील. त्यामुळे सरकारच्या दस्तऐवजांचे संरक्षण तर होईलच; परंतु प्रशासकीय कारभार जलद गतीने व पारदर्शक होईल, असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी व्यक्‍त केला. मंत्रालयातील दालनात निवडक पत्रकारांशी बांठिया बोलत होते. 
सध्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तासन्‌ तास प्रवास करून मंत्रालयात यावे लागते. ते येईपर्यंत कोणत्याही प्रकरणावर कार्यवाही होत नाही, एखादे प्रकरण अतितत्काळ असेल तर संबंधित अधिकारी आपल्या घरातूनही हे काम करू शकेल, या प्रक्रियेला "फ्लेक्‍सी अवर' योजना म्हणता येईल, असे बांठिया म्हणाले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS