भंगार जलमापकांवर कोट्यवधींचा खर्च - दिलीप लांडे
मुंबई- पालिकेने सुमारे 900 कोटी खर्चून परदेशातून भंगार जलमापके आणली आहेत. अत्याधुनिक म्हणून आणलेल्या या जलमापकांपैकी 90 टक्के जलमापके सध्या बंद आहेत. जलअभियंता खात्याला अद्याप गळती रोखता आलेली नाही. अनेक भागांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. मुंबईकरांच्या पैशाची ही उधळपट्टी आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाचे हे अपयश असल्याचा आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या वेळी केली.
मुंबईला मिळणाऱ्या तीन हजार 400 दशलक्ष लिटर इतक्या पाण्यापैकी 30 टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत आहे. ते पालिकेला रोखता आलेले नाही. सुमारे एक हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दोन हजार 400 दशलक्ष लिटर इतके पाणी मुंबईकरांना मिळते. अशी परिस्थिती असताना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सुजल मुंबई योजना आणून 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. यासाठी दोन हजार कोटी खर्च केले होते. ते पाणी गळतीत वाहून गेले, असेही लांडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
पाणीचोरी रोखणे, पाणीगळती रोखणे तसेच पाण्याचे अत्याधुनिक जलमापके यासाठी पालिकेने दोन हजार 900 कोटी खर्च केले आहेत; तरीही मुंबईकरांना अनेक भागांत दूषित पाणी मिळत आहे. 2007 सालच्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या वचननाम्यात 24 तास शुद्ध पाणी पुरविण्याचे वचन दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल लांडे यांनी केला.

No comments:
Post a Comment