आरक्षणाला सरसंघचालकांचा पाठींबा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी दलित व्यक्तीसुद्ध विराजमान होऊ शकते, अशी स्पष्ट भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली आहे. काम करणारा कोणीही सरसंघचालक हाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत एका मराठी वर्तमानपत्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्यावरही संघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सामाजिक भेदभाव असतो त्याठिकाणी आरक्षणाची गरज असते. सामाजिक विषमता संपुष्टात येईपर्यंत आरक्षण असावे. ही व्यवस्था अनिश्चित काळासाठी असू नये. संघ हिंदूंच्या मनातील सामाजिक विषमता दुर करण्याचा प्रयत्न करतो. समाजातील सर्व घटक एका रांगेत येईपर्यंत आरक्षणाची गरज आहे, असे मत व्यक्त करुन त्यांनी एकप्रकारे आरक्षणाला समर्थनाचीच भूमिका मांडली. सरसंघचालकपदाबाबत ते म्हणाले, या पदावर एखादी दलित व्यक्तीही येऊ शकते. त्यास काहीही बंधन नाही. जो काम करतो, असा कोणीही सरसंघचालक होऊ शकतो. तो दलितही असू शकतो. परंतु, तो केवळ दलित आहे म्हणून नव्हे, तर काम करतो म्हणून सरसंघचालक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. |


No comments:
Post a Comment