मुंबईतून घोडागाडी बंद करण्याची पेटाची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2012

मुंबईतून घोडागाडी बंद करण्याची पेटाची मागणी

मुंबईतून घोडागाडी बंद करण्याची पेटाची मागणी
मुंबई : घोडय़ांच्या आजारावर उपचार न करणे, त्यांची पिळवणूक करून घोडागाडीच्या माध्यमातून व्यवसाय करणे या व आदी घटकांचा विचार करत न्यायालयाने घोडागाडी व्यवसायाबाबत गांभीर्याने विचार करावा, असे ताशेरेओढत पालिकेला व शासनाला खडसावले आहे. तरीही घोडय़ांना क्रूरपणे वागणूक दिली जाते. याबाबत पेटातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंगळवारी दिला. 

मुंबईत 130 घोडागाडींच्या माध्यमातून व्यवसाय केला जातो. घोडय़ांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जात नाही. खांद्याला, पायाला जखमा असतात. रक्त वाहत असताना त्यांना गाडीला जुंपले जाते. भाजीमार्केटमधील सडलेल्या भाजीपाल्यावर त्यांचे पोटही भरत नाही. त्यांना मीठ खाण्यास न मिळाल्याने मुंबईतल्या दमट हवेत त्यांना चक्कर येणे, आदी आजार उद्भवत आहेत, असे संघटनेचे डॉ. मनिलाल यांनी सांगितले. 

पंढरपूर शहरात 110 टांगे आहेत. या ठिकाणी अशीच अवस्था आहे. त्या ठिकाणी अँनिमल राहत या संघटनेची कार्य सुरू आहे. संघटनेचे डॉ. चेतन यादव म्हणाले, ऊन, वारा, पाऊस यांपासून योग्य ते संरक्षण न करता आरोग्याची काळजी न घेता घोडय़ांना नरकयातना देण्यात येत आहेत. या वेळी पीपल फॉर अँनिमलच्या अंबिका हिरानंदनी, रिचल कोयमा, डॉ.अविनाश कुमार आदी प्राणिप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS