प्रिपेड मोबाईलवर आयएसडी सुविधा नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

प्रिपेड मोबाईलवर आयएसडी सुविधा नाही

प्रिपेड मोबाईलवर आयएसडी सुविधा नाही
नवी दिल्ली- प्रिपेड मोबाईल धारकांची आयएसडी सुविधा काढून घ्यावी, असे टेलिफोन रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे. दूरध्वनी कंपनीने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मोबाईल धारकाने केल्यावरच ही सुविधा संबंधित मोबाईल धारकाला द्यावी, असे ट्रायने म्हटले आहे.

ट्रायच्या नवीन निर्देशांप्रमाणे, येत्या सहा दिवसात तुमची आयएसडी सुविधा काढून घेतली जाणार असल्याचे दूरध्वनी कंपन्यांनी एसएमएसच्या माध्यमातून प्रिपेड मोबाईल धारकाला कळवावे. ट्रायच्या निर्देशानंतर दहा दिवसांच्या आत अशा स्वरूपाचा एसएमएस संबंधित ग्राहकांना मिळणे अनिवार्य आहे. जर एखाद्या प्रिपेड मोबाईल धारकाला ही सेवा सुरू ठेवायची असेल तर त्याने दूरध्वनी कंपनीचा एसएमएस मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत कंपनीशी संपर्क साधावा. अशा मोबाईल धारकाला आयएसडी सेवा पुरविण्याची संमती ट्रायने दिली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS