सफाई कामगारांची निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

सफाई कामगारांची निदर्शने


सफाई कामगारांची निदर्शने
मुंबई : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील 508 बदली सफाई कामगारांना कायम करण्यात यावे, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आबंडेकर कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.

या 508 कामगारांना महानगरपालिकेकडून 50 टक्के पगार दिला जातो. 20 वर्षे कोणत्याही पदाची भरती करण्यात आली नाही. भविष्यात जकातऐवजी स्थानिक कर प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ज्यादा उत्पन्न अपेक्षित आहे, मात्र कंत्राटी कामगारांच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका नाही. कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्या याबाबत न्यायालयाचे आदेशही आहेत, मात्र त्याबाबत अंमलबजावणी नाही. असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी सांगितले. शासनाने याप्रश्नी लक्ष घालून या कामगारांच्या वयाची अट शिथिल करून त्यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी नियमानुसार अदा करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही, असे सांगत या कामगारांनी निदर्शने केली. या वेळी महिलाही मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS