पाणीकपात रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

पाणीकपात रद्द


पाणीकपात रद्द
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये सध्या 12,44,064 द.ल.लि. पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या पाश्र्वभूमीवर मुंबईत लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात शनिवारपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांपैकी मोडक सागर, तानसा, तुळशी तलाव भरले आहेत, तर विहार तलावाची पाण्याची पातळी केवळ 1.13 मीटरने, अप्पर वैतरणाची 1. 46 मीटरने व भातसा तलावाच्या पाण्याची पातळी 0.45 मिटरने कमी आहे. सध्या या तलावक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. येत्या 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS