भारतात दररोज ४ हजार बालमृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

भारतात दररोज ४ हजार बालमृत्यू

भारतात दररोज ४ हजार बालमृत्यू
नवी दिल्ली - जगात पाच वर्षांखालील १९ हजार बालकांचा दररोज मृत्यू होतो. त्यात भारतात दररोज सुमारे ४ हजार १५0 बालमृत्यू होतात, असे धक्कादायक वास्तव युनिसेफच्या अहवालातून समोर आले आहे.
भारतातील बालमृत्यूचा दर जगात सर्वाधिक असून, २0११मध्ये देशात १५.५५ लाख बालकांचा मृत्यू झाला. या अहवालानुसार, सन २0११मध्ये जगातील एकूण बालमृत्यूंपैकी ५0 टक्के बालमृत्यू भारत, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान व चीन या पाच देशांत झाले. विशेष म्हणजे भारत या पाच देशांतही आघाडीवर आहे.
2011 मधील बालमृत्यू..
देश        बालमृत्यू 

नायजेरिया  ७.५६ लाख
कांगो      ४.६५ लाख
पाकिस्तान  ३.५२ लाख
चीन       २.४९ लाख 
इथिओपिया  १.९४ लाख
बांगला देश  १.३४ लाख 
इंडोनेशिया   १.३४ लाख

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS