गुटखाबंदीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

गुटखाबंदीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

गुटखाबंदीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम
मुंबई - गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदी मागे घेण्याच्या गुटखा उत्पादकांच्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायलयाने आज (शनिवार) फोटाळून लावत, राज्य सरकारने घेतलेला गुटखाबंदीचा निर्णय कायम ठेवला. 

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याला बंदी राहील, हे स्पष्ट झाले आहे. मॅग्नेशिअम कार्बोनेटसारख्या घातक पदार्थांचा समावेश असलेला गुटखा व पान मसाला नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असल्याचे सांगत, सरकारने गुटखा व पान मसाल्याच्या विक्रीला राज्यात बंदी घातली होती. महाराष्ट्र सरकारच्या या बंदीविरोधात गुटखा उत्पादकांनी तसेच पान मसाला उत्पादकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सर्व याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावत गुटखा उत्पादनांवरील बंदीचे समर्थन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS