कुत्र्यांच्या नसबंदिमधील भ्रष्टाचार
मुंबई मधील रहिवाशयाना मोकाट कुत्र्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दलचा लेख दैनिक जनतेचा महानायक मध्ये ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला होता. या भटक्या मोकाट कुत्र्यांबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी निधी मिळवून देणारे अधिकारी आणि निधी मिळवणाऱ्या संस्था यांचे चांगलेच फावले आहे.
भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिकेने ९ खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे. एका कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी पालिका या संस्थाना ३०० रुपये, कुत्रा पकडण्यासाठी १५० रुपये, संस्थेच्या कामासाठी १५०० रुपये अशे एकूण ६०० रुपये देते. घटके कुत्रे पकडण्यासाठी पालिकेकडे फक्त ४ गाड्या तर नसबंदी करणाऱ्या ९ संस्थांपैकी फक्त ३ संस्थांकडेच स्वतःच्या गाड्या आहेत. कुत्रे पकडण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी कमी प्रमाणात असताना व खाजगी संस्थाकडे योग्य सुविधा नसतानाही कुत्र्यांची नसबंदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे फुगवलेल्या आकड्यांवरून पालिकेने दावा केला आहे.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार १९९४ मध्ये २९७५, १९९५ मध्ये ४८९९, १९९६ मध्ये ४३७९,१९९७ मध्ये ५५८५, १९९८ मध्ये ४९३६, १९९९ मध्ये ५५९४, २००० मध्ये ५७२८,२०११ मध्ये ८२०४,२००२ मध्ये ७७६१,२००३ मध्ये ७६८२,२००४ मध्ये ७८५२,२००५ मध्ये ९२०४, २००६ मध्ये ११२४२,२००७ मध्ये १३१५२,२००८ मध्ये ३३२४५ , २००९ मध्ये ३३२४५, २०१० मध्ये ३४०४५, २०११ मध्ये २६९६१,२०१२ च्या ऑगस्ट पर्यंत १२१०३ असे एकूण २ लाख ४२ हजार ५३७ कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा संस्थेने केला आहे. नसबंदी साठी १९९८ ते २०१२ या काळात ७ करोड ४२ लाख ४५ हजार ६५ रुपये खर्च केले आहेत.
२००४ मध्ये ५१३११, २००५ मध्ये ४३९८०, २००६ मध्ये ४५१८३, २००८ मध्ये ६२७६३, २००९ मधे ७७६५२, २०१० मध्ये ७७४८४, २०११ मध्ये ८०८८९,तर २०१२ मध्ये आतापर्यंत ५६१५५ आहे ५ लाख ५० हजार लोकांना भटके कुत्रे चावले असल्याचे प्रकार घडले आहेत, तसेच २००४ मध्ये १६,२००५ मध्ये २७, २००६ मध्ये २१, २००७ मध्ये ३२, २००८ मध्ये १४,२००९ मध्ये १८,२०१० मध्ये १ ,२०११ मध्ये ६ तर २०१२ मध्ये आतापर्यंत ७ अशा एकूण १५५ लोकांचा मृत्यू झालेला आहे.
एकीकडे पालिका १९९४ पासून २ लाख ४२ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी ७ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाले असे सांगत आहे. २००७ मध्ये कुत्र्यांची गणती केली असता ७५ हजार कुत्रे असल्याचे पालिकेने म्हटले आहे. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करूनही नसबंदी केल्यावर कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २००७ ते २०१२ या कालावधी १ लाख ५२ हजार ७५१ कुत्र्यांची नसबंदी केल्याचे पालिकेच्या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.
एकीकडे कुत्र्यांची संख्या वाढत आहे.कुत्र्यांची संख्या वाढत असतानाच पालिकेने नसबंदी साठी २००९ - १० मध्ये ४ कोटी ५० लाख निधी पैकी २ कोटी ५५ लाख रुपये, २०१० -११ मध्ये ७ कोटी ५० लाख पैकी १ कोटी ७३ लाख रुपये, २०११ -१२ मध्ये ५ कोटी पैकी ९७ लाख रुपये तर तर २०१२ -१३ मध्ये २ करोड ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून फक्त १५ लाख रुपयेच खर्च झाले आहेत या नसबंदीच्या आकडेवारी वरून पालिकेने दिलेला निधी पूर्ण पणे खर्च झाला नसताना पुढील वर्षी पुन्हा निधी वाढवून देण्याचे काम करण्यात आले.
आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी नसबंदी होत असतानाही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे काबुल केले आहे विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी नसबंदीची योजना पूर्ण पणे फेल गेल्याचे म्हटले आहे. पालिका म्हणते त्या प्रमाणे अद्याप २ लाख ४२ हजार कुत्र्यांची नसबंदी केली असली तरी नसबंदी नंतर कुत्र्यांच्या कानावर इंग्रजी व्ही आकाराप्रमाणे खून केली जाते असे कुत्रे मुंबई मध्ये कुठेही दिसत नाही .यावरून कुत्र्यांच्या नसबंदीसाठी निधी उपलब्ध करून देणारे अधिकारी व निधी मिळवणाऱ्या संस्था यांचेच फक्त खिसे भरताना दिसत आहेत,
अजेयकुमार जाधव
मो ९९६९१९१३६३
--


No comments:
Post a Comment