''कोळशा''वरून लक्ष हटविण्यासाठी एफडीआय -लालकृष्ण अडवानी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

''कोळशा''वरून लक्ष हटविण्यासाठी एफडीआय -लालकृष्ण अडवानी



''कोळशा''वरून लक्ष हटविण्यासाठी एफडीआय -लालकृष्ण अडवानी
नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप गैरव्यवहारावरून लक्ष विचलित करण्यासाठी रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आज (शनिवार) केला. 

अडवानी यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे, की कोळसा खाण वाटप गैरव्यवहासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाच प्रमुख प्रश्‍न विचारले आहेत. त्यावर स्पष्टीकरण न देता त्याच दिवशी रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. सुधारणांचा विषय उपस्थित करून गैरव्यवहारावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, जर सरकार असा विचार करीत असेल तर ती सरकारची घोडचूक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत न्याय व्यवस्था, कॅग, विरोधी पक्ष आणि मीडिया सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावर धारेवर धरणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS