हरिद्वार- योगगुरु बाबा रामदेव यांना नव्या अडचणींना तोड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या आश्रमात तयार करण्यात आलेली उत्पादने निकृष्ट दर्जाची आढळली आहेत. उत्तराखंडच्या अन्न व औषधी प्रशासनाने या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात मीठ, मिरेपूड, लीचीचा रस, मोहरीचे तेल, जॅम, बेसन या वस्तुंचे नमुन्यांचा समावेश आहे. हे नमुने खाण्यायोग्य नाहीत, असा अहवाल प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे दिव्य फार्मसीला नोटीस पाठविण्यात आली असून तीन दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे.
अन्न व औषधी प्रशासनाने पाठविलेली नोटीस अद्याप प्राप्त झालेली नाही, असे बाबा रामदेव यांच्या पतंजलि योगपीठाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दुसरीकडे बाबा रामदेव यांनी आरोप केला आहे की, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन केलेल्या आंदोलनावरुन सरकार त्यांच्याविरुद्ध आकसापोटी कारवाई करीत आहे.

No comments:
Post a Comment