"भारत बंद'मध्ये शेकाप सहभागी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2012

"भारत बंद'मध्ये शेकाप सहभागी होणार


"भारत बंद'मध्ये शेकाप सहभागी होणार
मुंबई- डिझेल दरवाढ, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ सहा गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला दिलेली परवानगी, याविरोधात डाव्या पक्षांनी 20 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या "भारत बंद' मध्ये सहभागी होण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने आज घेतला. 

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाची बैठक आज मुंबईतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार गणपतराव देशमुख, पक्षाचे कार्यालयीन चिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अशोक ढवळे या बैठकीला उपस्थित होते. 
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS