उद्धव ठाकरे यांची मर्दुमकी त्या वेळी कुठे गेली होती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2012

उद्धव ठाकरे यांची मर्दुमकी त्या वेळी कुठे गेली होती


उद्धव ठाकरे यांची मर्दुमकी त्या वेळी कुठे गेली होती
मुंबई- डिझेल दरवाढीमुळे केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मुंबईत पाणीपट्टी वाढ, वीज दरवाढ, बेस्ट बस भाडेवाढ, मालमत्ता करात वाढ केली याचा विसर पडू देऊ नये. यामुळे डिझेल दरवाढीवरून कॉंग्रेसच्या मर्दुमकीला आव्हान देणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मर्दुमकी त्या वेळी कुठे गेली होती, असा सवाल कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केला. 

शिवसेनेने डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. या टीकेला कॉंग्रेस प्रवक्‍ते सावंत यांनी तितक्‍याच जोरात प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या मोर्चात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अत्यंत हीन पद्धतीने विडंबन केल्याचा आरोप सावंत यांनी केला. ते म्हणाले, की ""अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन महिलांचे विडंबन करणाऱ्या शिवसेनेला मर्दुमकीच्या गप्पा शोभत नाहीत.'' यातून शिवसेनेची विकृत मनोवृत्ती स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS