एफडीआयमुळे देशाच्या अखंडतेस धोका- प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2012

एफडीआयमुळे देशाच्या अखंडतेस धोका- प्रकाश आंबेडकर


एफडीआयमुळे देशाच्या अखंडतेस धोका- प्रकाश आंबेडकर



मुंबई  - किरकोळ क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस संमती देण्याच्या व विदेशी गुंतवणुकीबाबत राज्यांना स्वायत्तता देण्याच्या ‘यूपीए’च्या धोरणामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 
२० सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये भारिप सहभागी होणार असल्याचे सांगून आंबेडकर म्हणाले की, किरकोळ क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळावर येणार आहे. रिटेल मार्केटच्या साखळीमुळे शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये वाढच होईल. 

निधी उभारण्याबाबत राज्यांना स्वायत्तता देण्याचा केंद्राचा निर्णय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीस छेद देणारा आहे. कोळसा घोटाळ्याप्रमाणे यूपीए सरकारचा लोखंड घोटाळा लवकरच उघडकीस येण्याची शक्यता असून सरकार आपला कार्यकाल पूर्ण करु शकणार नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.  

विदेशी कंपन्यांच्या सुपर मार्केटपुढे राज्ये सरकार झुकतील. मॉल्सच्या साखळीपुढे देशी छोट्या व्यापा-यांचा मुळीच टिकाव लागणार नाही. अल कायदा आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष यापुढे वाढणार असून त्यामुळे कच्च्या तेलाचे आंतराष्‍ट्रीय बाजारातील दर वाढतील असे सांगून त्यामुळे महागाई कळसास पोहोचेल असेही आंबेडकर म्हणाले. 

-- 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS