प्रसारणमाध्यम क्षेत्रात ७४ टक्के गुंतवणुकीला परवानगी
नवी दिल्ली - प्रसारण माध्यम क्षेत्राला अधिक खुले करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने शुक्रवारी या क्षेत्रात ७४ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली. मात्र, यात दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्या आणि एफएम रेडिओ यांचा समावेश नाही. या क्षेत्रांसाठी एफडीआयची कमाल मर्यादा २६ टक्के आहे.
थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिलेल्या क्षेत्रात डीटीएच. एचआयटीएस, मल्टि सर्व्हिस ऑपरेटर्स आणि केबल टीव्ही या क्षेत्रांचा समावेश आहे. आतापर्यंत केबल टीव्ही आणि डीटीएच क्षेत्रात ४९ टक्के परकीय गुंतवणुकीची मुभा होती तर एचआयटीएस क्षेत्रात हेच प्रमाण ७४ टक्के इतके होते. एचआयटीएस या उपग्रह सेवेच्या माध्यमातून केबल चालकांना दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध केल्या जातात. त्याचबरोबर भविष्यातील आघाडीचे माध्यम ठरू शकणा-या मोबाइल टीव्ही क्षेत्रातही ७४ टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. |
Post Top Ad
15 September 2012
Home
Unlabelled
प्रसारणमाध्यम क्षेत्रात ७४ टक्के गुंतवणुकीला परवानगी
प्रसारणमाध्यम क्षेत्रात ७४ टक्के गुंतवणुकीला परवानगी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment