संत रोहिदास जयंतीची सुट्टी जाहीर करा! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2012

संत रोहिदास जयंतीची सुट्टी जाहीर करा!

संत रोहिदास जयंतीची सुट्टी जाहीर करा!
मुंबई : भारत सरकार महापुरुषांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी देऊन या महापुरुषांचा सन्मान करते. देशभरातील चर्मकार समाजाचे दैवत संत रोहिदास यांच्या जयंतीदिनी सरकारने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी गुरू रविदास धर्मसभेचे अध्यक्ष अच्युतराव भोईटे, व्ही. के. जवादे, अँड. विलासराव सुरसे यांच्या शिष्टमंडळाने लोकसभाध्यक्ष मीरा कुमार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन केली.

खा. भाऊसाहेब वाघचौरे, खा. एकनाथ गायकवाड, खा. भास्कर पाटील-खतगावकर, खा. गजानन बाबर, खा. गणेशराव दूधगावकर, खा. डॉ. संजीव नाईक यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना शिफारस करून संत रोहिदासांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली. देशभरात 20 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या चर्मकार समाजाचे संत रोहिदास महाराज दैवत आहेत. समतेसाठी त्यांनी लढा दिला. अशा या महान संतासाठी केंद्र सरकारने माघी पौर्णिमेला सुट्टी जाहीर करून या महापुरुषाचा सन्मान करावा, अशी मागणी भोईटे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS