अंजली दमानियांना नितीन गडकरी खेचणार कोर्टात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2012

अंजली दमानियांना नितीन गडकरी खेचणार कोर्टात

कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींचा सहभाग आहे, असे खळबळजनक आरोप करणा-या अंजली दमानिया यांच्याविरोधात गडकरी आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या टीममधील सदस्य असलेल्या अंजली दमानिया यांनी बुधवारी रात्री वृत्तवाहिन्यांवर थेटपणे गडकरी यांचे नाव न घेता विरोधी पक्ष अध्यक्षांचा शरद पवारांबरोबर भागीदारीत व्यवसाय असल्याचा आरोप केला होता.


वरळी येथील गडकरी यांच्या घरी आम्ही १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गेले होतो. भाजपच्या दोन कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या घरी गेल्यावर सिंचन घोटाळ्याबाबत विधानसभेत आवाज उठवावा, अशी मागणी केली. मात्र, शरद पवार आणि आमचे संबंध चांगले आहेत. ते आमची चार कामे करतात, आम्ही त्यांची चार कामे करतो, असे सांगत या प्रकरणावर शांत राहावे, असे गडकरी यांनी आपल्याला म्हटल्याचा दावा अंजली यांनी केला होता. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जनहित याचिका दाखल करु नये, अशा सूचना त्यांना दिल्या होत्या. यावेळी भैय्यू महाराजही तेथे उपस्थित होते, असा खुलासा दमानिया यांनी केला होता. मात्र, गडकरी यांनी आरोप फेटाळून लावत कोण या दमानिया, मी त्यांना ओळखत नाही, असे उत्तर दिले. तसेच आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप केल्याने अंजली यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS