ज्येष्ठांसाठी पालिकेचे नवे धोरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2012

ज्येष्ठांसाठी पालिकेचे नवे धोरण


 ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सरसावली असून त्यासाठी नवे धोरण ठरवत आहे. यामध्ये ज्येष्ठांच्या आरोग्यापासून ते विरंगुळ्यापर्यंत काळजी घेण्यात येणार आहे. तसेच हेल्पलाइनही सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. हे पालिकेचे हे नवे धोरण १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेने ठोस धोरण ठरवावे अशी सूचना भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी मांडली होती. त्यास सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने महापौर सुनील प्रभू यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार प्रशासनाने ज्येष्ठांसाठी स्वतंत्र धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला असून १ ऑक्टोबर रोजी ते जाहीर करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सभागृहनेते शैलेश फणसे यांनी सांगितले. प्रत्येक विभागात ज्येष्ठांकरिता विरंगुळा केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासन जागेच्या शोधात आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयात एक दिवस ठरवून त्यांची डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या दिवशी रुग्णालयात तपासणीसाठी येणार्‍या ज्येष्ठांना केसपेपर काढून देण्यापासूनची सर्व कामे पालिका कर्मचारीच करतील. तसेच त्यांच्यावर कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रियांमध्येही सूट देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पालिका रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना वयाचा दाखला देण्यासाठी आकारण्यात येणारे प्रमाणपत्र शुल्क आणि रुग्ण नोंदणी शुल्क विशेष बाब म्हणून रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनंत नर यांनी केली आहे. नर यांनी तशी ठरावाची सूचना पालिकेत मांडली आहे.वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी आपलीच समजून त्यांना प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारेे शुल्क रद्द करावे अशी मागणी नर यांनी केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS