| मुंबई = हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाह होत नसल्याने बौद्ध धर्मातील विवाह बेकायदा मानले जातात. त्यामुळे सरकारने बुद्धिस्ट पर्सनल लॉचे विधेयक लवकरात लवकर तयार करावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. बौद्ध धर्मीयांसाठी विवाह वारसा हक्कसंदर्भात वेगळा कायदा असणे न्यायसंगत असून केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्याक बौद्धांच्या मागणीकडे कधीच गंभीरपणे लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या समितीने लोकांकडून सूचना मागवल्या असून हा उलटा प्रवास सरकार करत असल्याची टीका कवाडे यांनी केली. या समितीने आधी प्रारूप तयार करून नंतर लोकांच्या सूचना मागवाव्यात तरच हा कायदा लवकर होईल, अन्यथा तो बारगळला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 23 ऑक्टोबर 2012 रोजी नागपूर येथे पक्षाचे अधिवेशन आणि भीमसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. |
Post Top Ad
28 September 2012
Home
Unlabelled
बुद्धिस्ट पर्सनल लॉ विधेयक ताबडतोब तयार करा : कवाडे
बुद्धिस्ट पर्सनल लॉ विधेयक ताबडतोब तयार करा : कवाडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment