सोशल मिडीया एक आव्हान - मनमोहनसिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2012

सोशल मिडीया एक आव्हान - मनमोहनसिंग


सोशल मिडीया एक आव्हान - मनमोहनसिंग
नवी दिल्ली - सोशल मिडीया एक आव्हान म्हणून आपल्यासमोर उभे राहिले असून, त्याचा सामना करण्याची गरज आहे. असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (शनिवार) म्हटले आहे.

अंतर्गत सुरक्षेसंदर्भात आज पंतप्रधानांनी देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. आसाममध्ये नुकतेच झालेल्या हिंसाचारानंतर अफवा पसरविण्यात येत असल्याने सोशल मिडीयाचा मुद्दा चर्चेत आला होता. 

पंतप्रधान म्हणाले, की सायबर सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार सायबर सुरक्षा नेटवर्क तयार करत आहे. दहशतवादी भारतात प्रवेश करण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करत आहेत. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. धर्मिक हिंसाचार हा अलिकडच्या काळात वाढलेली गोष्ट आहे. आपल्या पोलिसांनी समाजातील भावनांना समजून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच समाजात तणाव निर्माण करणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडले पाहिजे. कामावर एखादा कॉन्स्टेबल दोन समाजातील वाद वाढण्यापासून रोखू शकतो. यावर पोलिस प्रमुखांनी लक्ष दिले पाहिजे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS